सिंधुदुर्ग, 3 जून (हिं.स.)। कुडाळ येथील एका मोठ्या आस्थापनेमध्ये काम करत असलेल्या फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारी वरून तिथेच काम करत असलेला संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार हिंदू कॉलनी, मूळ रा पोहरे मशीवीवाडी ता. देवगड) याने फिर्यादी युवतीवर तिच्या मनाविरुद्ध लैंगिंक अत्याचार केल्या प्रकरणी त्याची ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांनी रु. ५० हजार च्या जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपी यांच्या वतीने ऍड. अमोल सुरेश सामंत आणि ऍड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले.
या प्रकरणात फिर्यादी हिने संबंधित संशयित आरोपी याच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून कुडाळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 134/2025 नुसार भा.न्या.सं. कलम 63(अ), 63(ड), 64, 75(1)i, 75(1)ii ,78(1), 332(ब), 351(2) प्रमाणे दि. 02/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.18/04/2025 रोजीच्या रात्री कुडाळ येथील अपार्टमेट मध्ये फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन फिर्यादी हिला संशयित आरोपी याने जॉब जाण्याची भीती घालून फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवून फिर्यादी हिला धमकी दिली. म्हणुन फिर्यादी हिने आरोपी याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली होती. म्हणून फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे.
कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजी. नं. 134/ 2025 च्या गुन्ह्या मधून आरोपी याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी म्हणून ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात अर्ज केला होता आरोपी यांच्या वतीने ऍड.अमोल सुरेश सामंत आणि ऍड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले. या कामी आरोपी याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेवून मे. कोर्टाने आज रोजी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर याची 50,000/- रुपयांच्या जामिनावर आणि अटी व शर्तीवर मुक्तता करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी