सावंतवाडीत बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
४ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त सिंधुदुर्ग, 3 जून (हिं.स.)। बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सातोळी तिठा येथे बांदा-संकेश्वर महामार्गावर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाई
सावंतवाडीत बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात


४ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग, 3 जून (हिं.स.)। बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सातोळी तिठा येथे बांदा-संकेश्वर महामार्गावर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत गाडीसह ४ लाख ३५ हजार २४० रुपये किमतीची दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. मोहसीन मनसुब काझी (वय २८) , औदुंबर पोपट सावंत (वय ३८, दोघे रा. सापटने भोसे काजी गल्ली, ता. माढा, जि. सोलापूर) असे त्यांचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार अमोल चंद्रकांत गोसावी यांनी दिली आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो गाडी, ५२ हजार ४४० रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग सुपीरियर व्हिस्कीच्या २ लीटर मापाच्या १९ बाटल्या, २२ हजार ८० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियम व्हिस्कीच्या ०२ लीटर मापाच्या ८ बाटल्या आणि ६० हजार ७२० रुपये किमतीच्या मॅकडॉवेल्स नं. १ रिझर्व्ह व्हिस्की ओरिजिनलच्या २ लीटर मापाच्या २३ बाटल्या असा एकूण ४ लाख ३५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande