३५ वी महाराष्ट्र राज्य सेपक टकरा स्पर्धेत नाशिकच्या महिलांना विजेतेपद
पुरुषांमध्ये नागपूर आणि वर्धा अंतिम फेरीत दाखल नाशिक, 30 जून (हिं.स.)। नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने आणि त्यांच्या अधिपत्याखाली नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये व
३५ वी महाराष्ट्र राज्य सेपक टकरा स्पर्धा.  नाशिकच्या महिलांना विजेतेपद.  पुरुषांमध्ये नागपूर आणि वर्धा अंतिम फेरीत दाखल.


३५ वी महाराष्ट्र राज्य सेपक टकरा स्पर्धा.  नाशिकच्या महिलांना विजेतेपद.  पुरुषांमध्ये नागपूर आणि वर्धा अंतिम फेरीत दाखल.


पुरुषांमध्ये नागपूर आणि वर्धा अंतिम फेरीत दाखल

नाशिक, 30 जून (हिं.स.)।

नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने आणि त्यांच्या अधिपत्याखाली नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये वरिष्ठ गटाच्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आजच्या तीसऱ्या दिवशी महिलांच्या सांघिक प्रकारात नाशिकच्या संघाने अमरावती संघावर २ विरुद्ध ० गुणांनी विजय मिळवत या ३५ व्या राज्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नाशिकची कर्णधार राष्ट्रीय खेळाडू हंसीनी जाधव, प्रिया घरटे. वेदिका महाले, आदिश्री बिरारी, प्रतीक्षा महाले आणि दिया महाले यांचा समावेश असलेल्या नाशिकच्या महिला संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत अंतिम लढतीत अमरावतीच्या संघावर प्रथमपासूनच दबाव राखत पहिला सेट २१-१४ असा जिंकून आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही नाशिकच्या संघाच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत दुसरा सेटही २१- १७ असा जिंकून सरळ दोन सेटमध्ये विजय प्राप्त करून विजेतेपद आपल्या नांवे केले. याआधी झालेल्या उपांत्य लढतीत नाशिकच्या संघाने पुणे संघाचा असाच सरळ दोन सेटमध्ये पराभव केला होता. तर चुरशीच्या झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमरावती संघाने पहिला सेट १८-२१ असा गमावला. परंतु त्यानंतर दुसरा सेट २१-१३ तर तिसरा निर्णायक सेट २१- १७ असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

पुरुषांच्या गटामध्ये पहिली उपांत्य लढत रंगतदार झाली. नागपूर विरुद्ध नांदेड या सेटमध्ये नागपूर संघाने संघाने चांगला खेळ करत हा सेट २१- १४ असा अजिँकुन १-० अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्ये नांदेड संघाने चांगला संघर्ष करत हा सेट २१-१९ असा जिंकून १-१ अशा बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र नागपूर संघाने शांत चित्ताने खेळत हा निर्णायक सेट २१-१८ असा जिंकू अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वर्धा संघाने जळगांव संघाला २-० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांचा अंतिम सामना अमी तिसऱ्या क्रमांकाचा सामना रात्री ८.०० वाजता खेळविला जाईल. सांघिक स्पर्धांबरोबर सेपक टकरामध्ये अंतर्भाव असलेल्या रेग्यू आणि डबल्स (दुहेरी) हे प्रकार खेळविले जात आहेत अशी माहिती तांत्रिक समितीने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande