यशस्वी जयस्वाल मुंबईकडूनच स्थानिक क्रिकेट खेळत राहणार
मुंबई, 1 जुलै (हिं.स.) : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय़ घेताला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्या विनंतीवरून गोव्याकडून खेळण्यासाठी मिळवलेले त्याचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. एमसीएचे
यशस्वी जयस्वाल


मुंबई, 1 जुलै (हिं.स.) :

यशस्वी

जयस्वाल मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय़ घेताला आहे. मुंबई क्रिकेट

असोसिएशनने त्याच्या विनंतीवरून गोव्याकडून खेळण्यासाठी मिळवलेले त्याचे ना हरकत

प्रमाणपत्र रद्द केले आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी एका निवदेनात म्हटले

आहे की, यशस्वी

हा नेहमीच मुंबई क्रिकेटचा एक चेहरा राहिला आहे. आम्ही त्याची एनओसी रद्द करण्याची

विनंती स्वीकारली आहे आणि तो आगामी स्थानिक हंगामात मुंबईसाठी उपलब्ध असेल.

यशस्वी

जयस्वालने एमसीएकडून एनओसी घेतली आणि गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी एमसीएने जयस्वालचा निर्णय आश्चर्यकारकअसल्याचे म्हटले होते. मात्र, एका महिन्यानंतर, जयस्वालने पुन्हा एमसीएला एक पत्र

लिहिले, ज्यामध्ये

असे म्हटले होते की, जयस्वाल त्याच्या कुटुंबासह गोव्याला जाण्याचा विचार करत आहे.

पण त्याने आपला निर्णय बदलला आहे आणि आता तो मुंबईसाठी खेळत राहणार आहे.

सलामीवीर जयस्वालने २०१९ मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये

पदार्पण केले. तेव्हापासून त्याने मुंबईसाठी १० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५३.९३

च्या सरासरीने आणि चार शतकांच्या मदतीने ८६३ धावा केल्या आहेत. जयस्वाल नुकत्याच

संपलेल्या स्थानिक हंगामातही मुंबईकडून खेळला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande