तब्बल १२ लाख लुटल्याप्रकरणी 7 आरोपी अटकेत अमरावती, 30 जून (हिं.स.) : मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल १२.३९ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशी घडली घटना – दि. २५ जून २०२५ रोजी शुभम मस्के व त्यांचे सहकारी शालीकराम धीकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम SBI बँकेत भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून मस्के यांच्याकडील रोख १२.३९ लाखांची रक्कम असलेली बॅग हिसकावली आणि पसार झाले. अटक आरोपी – 1. शेख समीर उर्फ सोनू शेख शफी वय २२ वर्ष 2. शेख साहिल उर्फ मोनु शेख शफी वय २४ 3. यश उर्फ आरू रवींद्र टेकाडे वय २३ वर्ष 4. विशाल उर्फ वंश राजेश खत्री वय २१ वर्ष , वरील सर्व राहणार नरखेड 5. तौसीफ खा शरीफ खा पठाण वय २२ (रा. येरला, मोर्शी) 6. तनीश उर्फ गोटया धनंजय पेंदाम, वय २१ (रा. नागपूर) 7. वि.सं.ग.प्र. बालक (रा. धरमपेठ, नागपूर) लुटीचा मास्टरमाइंड – शेख समीर उर्फ सोनू शेख हा या फायनान्स कंपनीत पूर्वी काम करत होता. त्याने आताच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवून लुटीची आखणी केली होती. आरोपींनी दोन वाहनांतून घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली व नागपूरमध्ये वाटप केले. जप्त मुद्देमाल – रोख रक्कम – ₹१,००,००० होंडा सिटी कार – ₹३,००,००० पल्सर २२० (विनाकागदपत्र) – ₹१,००,००० ४ अँड्रॉइड मोबाईल – ₹६०,००० एकूण किंमत: ₹५.६० लाख कारवाईत सहभागी अधिकारी – पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरण वानखडे, सपोनि सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले व इतर २० हून अधिक पोलिसांचे पथक कार्यरत होते.सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी