तेहरान, 30 जून (हिं.स.)
इराणच्या
सर्वोच्च शिया धर्मगुरूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध 'फतवा' जारी केला आहे. यामध्ये त्यांना देवाचे
शत्रू म्हटले गेले आहे. ग्रँड अयातुल्ला नासिर मकरिम शिराजी यांच्या फतव्यात
जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे इराणविरुद्ध
कारवाई करणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवण्यासही सांगण्यात आले आहे.इराणच्या
इस्लामिक राजवटीविरुद्धच्या धमक्यांना उत्तर म्हणून हा फतवा काढण्यात आला आहे.
इराणने अलीकडेच इस्रायल आणि अमेरिकेशी १२ दिवसांचे युद्ध लढले आहे.
या 'शत्रूंना' त्यांच्या विधानांबद्दल आणि चुकांबद्दल
पश्चात्ताप करायला लावणे हे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य आहे असे, या फतव्यात
म्हटले आहे. या फतव्यानुसार, जर कोणत्याही मुस्लिमाला या तथाकथित
जिहादमध्ये अडचणी आल्या किंवा त्याचे नुकसान झाले तर त्याला स्वर्गात 'देवाच्या मार्गात लढणारा' म्हणून बक्षीस मिळेल.१३ जून रोजी सुरू झालेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर हा फतवा
काढण्यात आला आहे. इस्रायलने इराणवर बॉम्बहल्ला केला.ज्यामध्ये इराणी लष्करी कमांडर आणि
शास्त्रज्ञ ठार झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायली शहरांवर बॅलिस्टिक
क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra