मुंबई, 30 जून (हिं.स.)। 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, सीझन २ आणण्याची घोषणा करण्यात आली.या बातमीमुळे चाहते खूप आनंदी असून शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोची लाँचिंग तारीख ३ जुलै असल्याचे सांगितले जात होते. पण आता शेवटच्या क्षणी, शोची लाँचिंग तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामागील कारण काय आहे हे मिहिरने म्हणजे स्वतः अमर उपाध्याय यांनी सांगितले आहे.
अभिनेता अमर उपाध्याय यांनी स्वतः लाँच तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की, सेट पुन्हा तयार करावा लागेल, ज्यामुळे शोची लाँच तारीख पुढे ढकलावी लागली. अमर म्हणाला की, सेटवरील रंगसंगती जशी असायला हवी होती तशी नव्हती. एकता कपूरला तिला काय हवे आहे हे चांगलेच माहित आहे, कारण ती एक परफेक्शनिस्ट आहे. तसेच शो ३ जुलै रोजी लाँच होत नाही याची माहिती देखील अमर उपाध्याय यांनी दिली. जे शो कधी प्रसारित होईल याबद्दल अमरने सांगितले की, मूळ प्रीमियरच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त चित्रीकरण केले जाईल. पण हा शो आता कधी प्रसारित होईल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, क्यूंकी सास भी कभी बहू थी' चे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुसरा सीझन ३ जुलै रोजी ऑन एअर होईल. पण आता चाहत्यांना शोसाठी आणखी थोडी वाट पहावी लागेल.या शोमध्ये स्मृती इराणी तुलसी आणि अमर उपाध्याय मिहिर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode