बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री
मुंबई, 30 जून (हिं.स.)।अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय कारकीर्दिला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली होती. हम पांच या मालिकेतून विद्याने प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं
Vidya balan


मुंबई, 30 जून (हिं.स.)।अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय कारकीर्दिला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली होती. हम पांच या मालिकेतून विद्याने प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.

झी मराठीवर 'कमळी' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. कमळीला ती शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. भारताची आर्थिक राजधानी कोणती? असं विचारताच कमळी मुंबई असं उत्तर देते. नंतर ती कमळीला मुंबईतील विमानतळाचं नाव काय, असं विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नावर मात्र कमळीची बोबडी वळते. कमळी आणि विद्याचा हा मजेशीर प्रोमो व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. विद्या बालनला कमळी मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आजपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande