अमरावतीत : 27 केंद्रांवर 9 हजार 696 विद्यार्थी देणार सेटची परीक्षा
अमरावती, 4 जून (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभाग द्वारा संचालित केली जाणारी एम.एस.-सेट-२०२५ परीक्षा आगामी १५ जून रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.
अमरावतीत एमएस-सेट परीक्षेची तयारी:15 जूनला 27 केंद्रांवर 9 हजार 696 विद्यार्थी देणार परीक्षा


अमरावती, 4 जून (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभाग द्वारा संचालित केली जाणारी एम.एस.-सेट-२०२५ परीक्षा आगामी १५ जून रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शहरात एकूण २७ केंद्र राहणार असून या केंद्रांवरुन ९ हजार ६९६ विद्यार्थी परीक्षा देण्यात आहेत. अमरावती विद्यापीठाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार अमरावती शहरातील विद्याभारती महाविद्यालय, विद्याभारती कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सी.के. नायडू मार्ग, कॅम्प अमरावती, गोल्डन किड्स इंग्लिश प्रायमरी स्कुल, कॅम्प, शिवाजीनगर, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, मोर्शी रोड अमरावती आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे ही परीक्षा होईल. याशिवाय शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (भाषा भवन), पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, विंग ए मुख्य इमारत, विंग बी कॉम्प्युटर अँड एआय अँड डीएस इमारत, विंग सी इलेक्ट्रिकल इमारत, विंग डी सिव्हील अँड मेकॅनिकल इमारत, न्यू हायस्कूल मेन, जोग चौक, नुतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, जोग चौक तसेच महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती येथेही ही परीक्षा घेतली जाणार आहे.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अंबादेवी रोड, ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, दसरा मैदान रोड, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ब्लॉक बी, ब्लॉक डी, बडनेरा रोड, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, एफवायबीई अँड सिव्हील बिल्डींग, सी.एस.ई. बिल्डिंग, बडनेरा रोड, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (आयओटी) एआय अँड डीएस प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, ब्लॉक ए, ब्लॉक बी., ब्लॉक सी, ब्लॉक डी, ब्लॉक ई अंजनगांव बारी रोड अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, एम.सी.व्ही.सी. इमारत आणि मुख्य इमारत, मोर्शी रोड अशा एकूण २७ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी देखील विशेष सोय दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी परीक्षेच्या तीन दिवस आधी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर विधी विभागाच्या प्राध्यापक व एम.एस.-सेट परीक्षेच्या समन्वयक डॉ. कल्पना जावळे यांच्याशी ९४२००३४३८५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande