लॉस एंजलिसमध्ये अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला वाढता विरोध
ट्रम्प प्रशासनाकडून २ हजार जवान तैनात वॉशिंगटन , 9 जून (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या अवैध प्रवाशांविरुद्ध मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड
Trump government


ट्रम्प प्रशासनाकडून २ हजार जवान तैनात

वॉशिंगटन , 9 जून (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या अवैध प्रवाशांविरुद्ध मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे.लॉस एंजलिसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असून पॅरामाऊंट शहरातही स्थानिक प्रशासनावर याच पक्षाची पकड आहे.

अवैध प्रवाशांवर कारवाईसाठी लॉस एंजलिसमध्ये छापे टाकले गेले. यात १००हून अधिक लोकांना अटक झाली होती. नंतर शुक्रवारी (दि.६) झालेल्या कारवाईने या भागात तणाव अधिक वाढला. शुक्रवारी स्थलांतराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर काही नागरिकांची स्थानिक पोलिसांशी चकमक झाली होती. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला होता. हा वाढता विरोध पाहता आता थेट लष्करी जवान तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध राज्यांत तणाव आणखी वाढेल, असा आरोप कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर व डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते गॅव्हिन न्यूसम यांनी केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरिताचे नियम कडक करून अवैध प्रवाशांविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर सुमारे १ हजार लोकांनी अमेरिकेत संबंधित विभागाला घेराव घातला. या ठिकाणचे अधिकारी व सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. इमारतीचेही नुकसान केले. यानंतर ट्रम्प प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली आहेत.

निदर्शकांनी आंदोलनात शहरातील अनेक भागांत आग लावली. कार पेटविण्यात आल्या, यादरम्यान अनेक घरे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सनाही आग लावण्यात आली. निदर्शकांनी फलक हाती घेत सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी अनेकांना अटक केल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

अमेरिकी तपास संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी लॉस एंजलिसमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. कोणीही पोलिसांवर हल्ला केला तर त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे पटेल यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande