पाकिस्तान सैन्य आणि बलूच बंडखोरांमधील झटापटीत पाकचे २३, बलूच आर्मीचे ९ जवान ठार
इस्लामाबाद , 11 जून (हिं.स.) पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये मोठी झटापट झाली आहे. वेगवेगळ्या झटापटीत पाकिस्तानी सैन्याचे २३ जवान मारले गेले तर या संघर्षात बलूच लिबरेशन आर्मीचे ९ जवानही ठार झाल्याची माहिती समज
Baluch army Pakistan


इस्लामाबाद , 11 जून (हिं.स.) पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये मोठी झटापट झाली आहे. वेगवेगळ्या झटापटीत पाकिस्तानी सैन्याचे २३ जवान मारले गेले तर या संघर्षात बलूच लिबरेशन आर्मीचे ९ जवानही ठार झाल्याची माहिती समजतं आहे.

बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जायंद बलूच यांनी एक निवेदन जारी करून म्हंटले आहे की, गोनी पारानजीक झालेल्या संघर्षात पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे कमांडो उतरवायला लागल्याचे सांगण्यात आले.

६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत होते तेव्हा बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांची झटापट झाली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याचे ८ जवान मारले गेले तर अनेकजण जखमी झाले. त्याशिवाय ८ जूनला आणखी एक चकमक झाली त्यातही पाकिस्तानी सैन्याचे जवान मारले गेले. बलूचिस्तानात अनेक भागात हा संघर्ष सुरू असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते म्हणाले.

बलूचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलूचिस्तानात उतरवले आहे तरीही बलूचिस्तानातील बंडखोर भारी पडत आहेत. मागील काही दिवसांपासून बलूचिस्तानच्या अनेक शहरांवर कब्जा करण्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. बलूच बंडखोरांना मिळणाऱ्या यशाने पाकिस्तानी सैन्य खवळलं आहे. त्यातूनच तिथल्या नागरिकांविरोधात सैन्याने क्रूर अभियान सुरू केले. बलूचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande