अकोला - भिकुंड नदीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ
अकोला, 1 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भिकुंड नदी पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळताच परिसरात भीती व खळबळजनक वातावरण पसरले. नागरिकांच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संभाजी
अकोला - भिकुंड नदीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ


अकोला, 1 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भिकुंड नदी पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळताच परिसरात भीती व खळबळजनक वातावरण पसरले. नागरिकांच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संभाजी हिवराळे, पोहेकॉ रफिक शेख, सलीम पठाण, प्रफुल वानखडे, अनंता सुरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मृताची ओळख अद्याप पटलेली नसून बाळापूर पोलीस स्टेशनमार्फत शोधपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. सदर मृत इसमाचे वय अंदाजे ५३ वर्ष, रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा मध्यम, चेहरा लांबट, नाक सरळ, केस पांढरे आहेत. अंगात काळ्या रंगाचे नवे शर्ट असून, पायात काळ्या रंगाचे फुगलेले पावसाळी बूट आहेत. प्रेत ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे लाचारीत ठेवण्यात आले आहे.

सदर वर्णनाची व्यक्ती पोलीस ठाणे क्षेत्रात हरवली असल्यास संबंधित नातेवाईकांनी तातडीने पो.स्टे. बाळापूर (फोन – ०७२५७-२३२१२०), पोलीस नियंत्रण कक्ष अकोला (०७२४-२४३५५००), पोलीस निरीक्षक अनिल जुमळे (मो. ७२९२३०७४४४) अथवा तपास अधिकारी पो.हे.कॉ. अनंता सुरवाडे (मो. ९७६५७३८५३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande