नाशिक, 1 जुलै (हिं.स.)। जुने नाशिक परिसरामध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी वर्गणी न दिल्याने कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली तातडीने पोलिसांनी घटनास्थळी डाव घेतली. आणि परिस्थिती वरती नियंत्रण मिळवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकाली परिसरातील नानावलीत केवळ 10 रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेला किरकोळ वादाने काही क्षणातच मोठरूप धारण करणार, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण हा वाद फक्त वर्गणी वरून सुरू होता आणि तो मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास रजा फिरोज शेख (वय 16) या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्रित येत थेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.
हल्ला इतका जबरदस्त होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. रजाची स्थिती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे भद्रकाली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुने नाशिक परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI