भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ - असीम मुनीर
इस्लामाबाद , 01 जुलै (हिं.स.) : पाकिस्तान नेहमीच काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला दिली आहे. असीम मुनीर कराची याठिकणी पाकिस्तानी नौदल अका
Asim munir


इस्लामाबाद , 01 जुलै (हिं.स.) : पाकिस्तान नेहमीच काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला दिली आहे. असीम मुनीर कराची याठिकणी पाकिस्तानी नौदल अकादमीमध्ये आयोजित पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आले असताना येथे भाषणादरम्यान त्यांनी भारताला इशारा दिला आहे.

असीम मुनीर म्हणाले, “भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो एक वैध संघर्ष आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मीरला मदत करेल.” असे त्यांनी म्हटले आहे. मुनीर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “जर भारताने भविष्यात हल्ला केला तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. आम्ही हे दोनदा केले आहे. प्रथम आम्ही २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला उधळून लावला आणि आता ऑपरेशन सिंदूर.” याचदरम्यान, त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना समर्थन देत भारत आणि काश्मीरबद्दल अनेक भडकावू गोष्टी देखील सांगितल्या.असीम मुनीर यांची भारताला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही तर त्यांनी यापूर्वीही अनेकदा भारताविरुद्ध विष ओकले आहे.आता पुन्हा एकदा त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना समर्थन दिले आहे.

दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या काळात पाकिस्तानी सैन्याने अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सैन्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली. तथापि, यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. भारतीय नौदल देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान करणार होते, असे एका वृत्तानुसार, नौदलाने लक्ष्य निश्चित केले होते, परंतु त्यांना आदेश देण्यात आले नव्हते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande