मोर्शीत विद्युत केबल, पंप मोटर चोरी प्रकरणात दोघे जेरबंद, १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 1 जुलै (हिं.स.) मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांत विविध शेतकऱ्यांच्या विहिरीवरून तसेच विद्युत खांबांवरील तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण १.५३ लाख रुपयांच
मोर्शी पोलीसांची मोठी कारवाई : विद्युत केबल, पंप मोटर चोरी प्रकरणात दोघे जेरबंद, १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 1 जुलै (हिं.स.)

मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांत विविध शेतकऱ्यांच्या विहिरीवरून तसेच विद्युत खांबांवरील तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण १.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

फिर्यादी विक्रमादित्य तडस, मनोहर भोरे व श्रेयश काळे यांनी शेतातील विद्युत केबल, पंप मोटर व तारांचे चोरीसंबंधी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करत हरिदास घोडगाव (रा. नशिरपूर) व मनोज मडावी (रा. नशिरपूर) यांना अटक केली.सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

जप्त मुद्देमालामध्ये

ओरिएंट कंपनीची ५ एचपी पंप मोटर (१०,०००/-)१२५० मीटर अ‍ॅल्युमिनियम विद्युत तार (४०,०००/-)

३० फुट निळ्या रंगाचा केबल (२,०००/-)

चोरीत वापरलेली डिस्कव्हर मोटरसायकल (३०,०००/-)

काटोल पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील चोरीची पल्सर गाडी (७०,०००/-)

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande