देवळाली रेल्वे स्टेशनचा शताब्दी महोत्सव उत्साहात
देवळाली, 14 जुलै (हिं.स.)। देवळाली रेल्वे स्टेशनचा शताब्दी स्टेशन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांसह स्थानिक शाळांमधील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी नाशिकरोड येथील रेल्वे सुरक्षा बल बँडच्या जल
देवळाली रेल्वे स्टेशन


देवळाली, 14 जुलै (हिं.स.)।

देवळाली रेल्वे स्टेशनचा शताब्दी स्टेशन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांसह स्थानिक शाळांमधील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी नाशिकरोड येथील रेल्वे सुरक्षा बल बँडच्या जल्लोषात सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास भुसावळ विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी, कार्मिक अधिकारी दिलीप खरात, यांत्रिक अभियंता रोहित राजपूत यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या महोत्सवात देवळालीतील चार शाळांतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी भारताच्या तिरंगी ध्वजाच्या रंगसंगतीत खास आसनासह कॅपची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बौद्धिक पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

देवळाली रेल्वे स्थानक इमारत तिरंगी रोषणाईने उजळवण्यात आली होती. यावेळी उभारण्यात आलेल्या पंचवटी रेल्वे संग्रहालयात दुर्मिळ आणि ऐतिहासिक रेल्वे उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले. यासोबत यांत्रिक कोचेस, वॅगन्स, विद्युत इंजिने आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही करण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande