अकोला : कावड पालखी उत्सव नियोजन बैठक संपन्न
अकोला, 30 जुलै (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा ही एक वैभवशाली धार्मिक परंपरा आहे. या पवित्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून सर्व आवश्यक सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात, अशा सूचना आमदार पठाण यांनी जिल्हाधि
P


अकोला, 30 जुलै (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा ही एक वैभवशाली धार्मिक परंपरा आहे. या पवित्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून सर्व आवश्यक सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात, अशा सूचना आमदार पठाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या नियोजन बैठकीत दिल्या.यावेळी कावड पालखी मंडळाचे अध्यक्ष राजेश भारती, ॲड. पप्पू मोरवाल, चंद्रकांत सावजी, डॉ. प्रशांत वानखडे, आकाश कवडे, महेंद्र गवई, धारगड यात्रा समितीचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल, सुहास वाघ आदी उपस्थित होते.

गांधीग्राम येथून राजराजेश्वर मंदिरापर्यंत जल नेऊन जलाभिषेक करण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेला असला तरी काही ठिकाणी पॅचवर्कचे काम अद्याप अपूर्ण आहे. तसेच या मार्गावरील झाडे व झुडुपांची छाटणी, रस्त्यावर विद्युत रोषणाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.कावड पालखी यात्रेत महिला मंडळांची देखील सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे या महिला कावड मंडळांना विशेष पोलिस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी सूचनाही आ. पठाण यांनी केली.

धारगड यात्रेसाठीही सुविधा पुरविण्याची मागणी

अकोट तालुक्यातील श्री क्षेत्र धारगड येथे तिसऱ्या रविवारी व श्रावण सोमवारी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. ही यात्रा १०० वर्षांहून अधिक जुनी असून दरवर्षी श्रावणच्या तिसऱ्या रविवारी व सोमवारी येथे गर्दी होते. मात्र, वन विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले.मागील वर्षी या मार्गावर दुचाकी वाहने अडकली होती तसेच भाविकांचे पाय दलदलीत फसत होते. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती, वाण नदीवरील पुलाचे काम तसेच सर्व सुविधा येत्या १० ऑगस्टपूर्वी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अध्यक्ष सुरेश अग्रवाल आणि सुहास वाघ यांनी केली.

यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी शांतत समितीची नियोजन बैठक कावड पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती आणि ॲड. पप्पू मोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande