चंद्रपूर, 30 जुलै, (हिं.स.)। चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारला सकाळी ११ वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह हे राहणार आहेत. उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पत्रकार डॉ. गणेश खवसे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव