पुणे मनपाचे विभाजन करून दोन महापालिका करण्याची मागणी
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेचे विभाजन करावे आणि दोन महापालिका कराव्यात, अशी मागणी काही माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समिती तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी केली आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यावर चर्चा करण्यासा
PMC news


पुणे, 14 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेचे विभाजन करावे आणि दोन महापालिका कराव्यात, अशी मागणी काही माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समिती तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी केली आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी माजी महापौर अंकुश काकडे, संजय बालगुडे यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.

यात पुणे शहराचे सर्वपक्षीय माजी महापौर, माजी उपमहापौर, जि.प.चे माजी अध्यक्ष, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सहभागी झाले. त्यात या प्रस्तावावर एकमत झाले.

पुणे महानगरपालिकेची स्थापना १९५० साली झाली. त्यानंतर १९९७ साली पहिल्यांदा महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार झाला. २०१७ पासून ३४ गावांचा समावेश झाला. त्यानंतर दोन गावे वगळण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात विविध गावांचा समावेश सातत्याने सुरू आहे. एकीकडे क्षेत्र वाढत असताना कर्मचारी, अधिकारी व एकूणच सोयी सुविधा मात्र वाढत नाहीत. नव्याने समाविष्ट झालेली गावे झपाट्याने ओसाड होत आहेत.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande