अहिल्यानगर दि. 14 जुलै (हिं.स.) :- स्वयंशिक्षणाचा आत्मा विद्यार्थ्यांमध्ये जागा झाला पाहिजे. त्यांच्याकडे सतत प्रश्न असावेत, जिज्ञासा असावी आणि त्यातूनच आत्मविकासा ची प्रक्रिया घडत जाते. खरं तर शिक्षकसुद्धा अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून शिकत असतो.त्यांची ऊर्जा आणि दृष्टिकोन यामधून शिक्षकालाही नव्याने विचार करावा लागतो.शिक्षण हे केवळ एकतर्फी न राहता, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या तील संवादाची देवाण-घेवाण याची सजीव प्रक्रिया असते. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन, योग्य साधने आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे. तसेच नवनवीन शिक्षण पद्धती,तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सततची आत्मपरीक्ष णा ची सवय ही त्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक वृद्धिंगत करू शकते, असे प्रतिपादन जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले.
शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला येथे शैक्षणिक साहित्य वाटप माध्यमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धो.कासवा, माध्यमिक मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni