सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 55 होते.
त्यांच्यावर दुपारी मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि स्थानिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुनिल बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण व शेतकरी प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत होते. संयमी, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन कार्यात मैंदर्गी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड