वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने किटकनाशक फवारणी करू नये; कृषी विभागाचा सल्ला
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामातील पेरणी आटोपली आहे. सध्या बहरलेल्या पिकात तणनाशक व किटकनाशक फवारणीची लगबग सुरू आहे. हंगामात वेळेवर पेरणी झालेल्या पिकांवर तणनाशक व किटकनाशक फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी. विषबाधा टाळावी. व
वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने किटकनाशक फवारणीने विषबाधेचा धोका अधिक:कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, खरीप हंगामात खबरदारीची गरज


अमरावती, 14 जुलै (हिं.स.)

तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामातील पेरणी आटोपली आहे. सध्या बहरलेल्या पिकात तणनाशक व किटकनाशक फवारणीची लगबग सुरू आहे. हंगामात वेळेवर पेरणी झालेल्या पिकांवर तणनाशक व किटकनाशक फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी. विषबाधा टाळावी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने किटकनाशक फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

यावर्षी शेतीतील पीक चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. सद्यस्थितीत मजुरांअभावी तणनाशक व किड नियंत्रणासाठी किटकनाशक फवारणीची शेतकऱ्यांची धामधूम सुरू आहे. किटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे किटकनाशक फवारणी करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. किटकनाशकाचे मिश्रण काडी किंवा लाकडी दांड्याने नीट मिसळावे. अपघाताने औषध अंगावर उडाल्यास त्वरित स्वच्छ धुवावे. नोझल साफ करण्यासाठी तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा. किटकनाशके मूळ पॅकिंगमध्येच खरेदी करावीत. तसेच फवारणीनंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत. त्यानंतर अंग साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

नियमांच्या पालनासह फवारणी करावी; धोका नाही ...

कृषी अधिकारी सावरकर खरीप हंगामात शेतकरी किड नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, मास्क, चष्मा आदींचा वापर करावा. किटकनाशके अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. संबंधित विक्रेत्यांकडून बिल घ्यावे. नियमांच्या पालनासह फवारणी करावी. तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, अशी प्रतिक्रीया प्रभारी तालुका कृषी अधिकारी अमोल सावरकर यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande