आयसीसीकडून मोहम्मद सिराजवर दंडात्मक कारवाई
दुबई, 14 जुलै (हिं.स.) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. ३१ वर्षीय सिराजला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर त्याच्या सामना
मोहम्मद सिराज


दुबई, 14 जुलै (हिं.स.)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला

आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. ३१ वर्षीय सिराजला

आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर त्याच्या सामना

शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५च्या

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बेन डकेटशी भांडताना सिराजने आयसीसीच्या नियमांचे

उल्लंघन केल्याचे आढळून आले.आणि त्यामुळेच त्याला आता आयसीसीकडून शिक्षा ही झाली

आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या

दिवशी जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सलामीवीर बेन

डकेटला बाद केले. तेव्हा

तो आक्रमकपणे आनंद साजरा करताना दिसला. सिराजने इंग्लिश फलंदाजाकडे पाहिले आणि या

वेळी तो फलंदाजाच्या अगदी जवळ होता. ज्यामुळे दोघांचेही खांदे एकमेकांवर आदळले. इंग्लंडच्या

डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली. जेव्हा सिराज भारताकडून गोलंदाजी करत होता.

या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेन डकेटने रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. जो

सिराजला आधीच समजला होता. सिराजने एक शॉर्ट बॉल टाकला ज्यावर डकेट जसप्रीत बुमराहकडे झेल देऊन

बाद झाला होता.

बेन

डकेटला बाद केल्यानंतर सिराजने ज्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याबद्दल आता

आयसीसीने त्याला शिक्षा केली आहे. सिराजच्या मॅच फीच्या १५ टक्के रक्कम कापली

जाईल. याशिवाय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande