छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै, (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवक व युवतीसाठी रेड रन स्पर्धा घेण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापीठ गेट येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.एम. मुदखेडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज चौक येथुन परत याच मार्गाने क्रीडा विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, येथे समारोप करण्यात आला.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकूमार रामटेके, कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉ.सोनाली क्षिरसागर, क्रीडा संचालक सरस्वती भूवन डॉ.दयानंद कांबळे, प्रशिक्षक क्रीडा विभाग सुरेंद्र मोदी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार उपस्थित होते.
रेड रन स्पर्धेत सहभागी युवक - युवती मधुन प्रथम क्रमांक अतुल जाधव, संत तुकाराम महाविद्यालय कन्नड, द्वितीय क्रमांक – लक्ष्मण अप्पासिंग पावरा, पंडीत नेहरु महाविद्यालय, तुतीय क्रमांक – रोहित राजपुत जीवन प्रगती महाविद्यालय करमाड, युवतीमधून प्रथम क्रमांक – मनिषा बा पाडवी नेहरु महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – अर्चना महोदव जाधव, तृतीय क्रमांक – गायत्री गायकवाड
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस दोन हजार रुपये, द्वितीय बक्षीस पंधराशे रुपये, तृतीय बक्षीस रुपये एक हजार देण्यात आले. रेड रन स्पर्धा समारोप प्रसंगी अ.भा.कलामंच पथनाट्याद्वारे एचआयव्ही, एड्स आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis