वारीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरसह सर्व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रूम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याव्दारे पंढरपुरातील सर्
वारीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरसह सर्व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)।

आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रूम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याव्दारे पंढरपुरातील सर्व भाविकांना २४ तास मोफत सेवा दिली गेली.

यात्रा कालावधीत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने मोबाईल नेटवर्कला अडथळे वारंवार येत असल्यामुळे या वर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व रुग्णवाहिकामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. पंढरपुरात अद्ययावत असणारी कंट्रोल रूम वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपींग या सर्व गोष्टीमुळे १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली.

आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरूपाच्या १२४० रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या १५ हजार ४७६ रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण १६ हजार ७१६ रुग्णांनी १०८ या मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात आली. यात्रेचा सांगता समारोप ११ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande