अकोला, 2 जुलै (हिं.स.) : अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गायींची तस्करी केली जात आहे.. गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६ गायींचा जीव वाचवला. यादरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातून गायींची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या चार चाकी झडती घेतली असता, गाडीतील सीट्स काढून त्यामध्ये ६ गायी कोंबून ठेवलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ वाहन जप्त करून संबंधित तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच या गायींना आदर्श गौसेवा संस्थांमध्ये पाठवण्यात आलं आहे. यादरम्यान गायींच्या तस्करीच्या घटना जिल्ह्यात रात्री २ ते पहाटे ५ या वेळेत तस्कर वाहनांद्वारे जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे उघड झाले असून दर्यापूर आणि अमरावती वरून अकोल्याला येणारा मूर्तिजापूर रस्ता व आपातापा रस्त्याचा विशेष वापर होतो आहे. बोरगाव मंजू पोलिसांच्या दक्षतेमुळे ६ निरपराध गायींचा जीव वाचला असून, नागरिकांनीही अशा अनैतिक कृत्यांविषयी पोलिसांना वेळेवर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे