सोलापूर, 3 जुलै (हिं.स.)।
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर व अवैध धाब्यावर केलेल्या धडक कारवाईत रूपये 14,45,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक एस आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली 15गुन्हे नोंद करुन राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 9550 ली. रसायन,235लि. हातभट्टी दारु,194.22ब. लि. देशी मद्य,30.24ब.ली. विदेशी मद्य.78ब.लि. बिअर तसेच एक चार चाकीवाहनासह एकुण रूपये14,45,400/- रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच दि.01जून व30जून2025या कलावधीत रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण229गुन्हे नोंद करण्यात आले असुन214जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत65,550ली. रसायन,5793लि. हातभट्टी दारु,499ब. लि. देशी मद्य,128ब.ली. विदेशी मद्य,102.32ब.ली. बिअर,2467ली. ताडी,1260ब.ली.गोवा
बनावटीचे विदेशी मद्य तसेच27वाहनासह एकुण रूपये10337238/-रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्टी दारु व ताडी विकीवर कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
तसेच या विभागाकडुन सदर कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण27ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात कारवाई करण्यात आलेली आहे.
अवैध मद्यविक्री,अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून,अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री18002339999क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक8422001133यावर कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल अशी माहितीअधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव,यांनीदिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड