माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
ढाका, 2 जुलै (हिं.स.) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ह
शेख हसीना


ढाका, 2 जुलै (हिं.स.)

बांगलादेशच्या

माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले

आहे. त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ही शिक्षा जाहीर केली आहे. बुधवारी तीन

सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या

खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मजूमदार होते. शेख हसीना

यांना कोणत्याही प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ

आहे.

गेल्या

वर्षी शेख हसीनाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर

व्हायरल झाली होती आणि नंतर बांगलादेशी मीडियानेही ती प्रसारित केली होती. या ऑडिओ

क्लिपमध्ये शेख हसीना गोविंदगंज उपजिल्हा अध्यक्ष शकील बुलबुल यांच्याशी बोलत

होत्या. ज्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की 'माझ्यावर २२७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मला २२७ लोकांना मारण्याचा

परवाना मिळाला आहे.' आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने

न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणात शकील बुलबुल यांना दोन महिन्यांच्या

तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.

आंतरराष्ट्रीय

गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या विधानाला अवमान मानले आणि न्यायालयाचे अवमान

केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवले. न्यायालयाने म्हटले की, आरोपी न्यायालयात शरण

आल्यानंतर अथवा पोलिसांनी अटक केल्यानंतरच शिक्षा सुरू होईल. ही सक्तमजुरीची

शिक्षा होणार नाही. शेख

हसीना यांच्या विधानाचे वर्णन पीडितांना आणि साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न

असल्याचे सांगितले. फॉरेन्सिक तपासणीच्या आधारेतपासकर्त्यांनी सांगितले की, ऑडिओ क्लिपमधील

आवाज शेख हसीना यांचा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande