जळगाव - धावत्या रेल्वेखाली परधाडे येथील दोघांची आत्महत्या
जळगाव, 2 जुलै, (हिं.स.) - परधाडे येथील विवाहित महिलेसह एका विवाहित तरुणाने कोणत्यातरी धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली असून सदर घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात
जळगाव - धावत्या रेल्वेखाली परधाडे येथील दोघांची आत्महत्या


जळगाव, 2 जुलै, (हिं.स.) - परधाडे येथील विवाहित महिलेसह एका विवाहित तरुणाने कोणत्यातरी धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली असून सदर घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यरात्री परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे किमी.नं.२८४ जवळ अपरेल्वे लाईन मध्ये परधाडे येथील विवाहिता मीनाबाई बबलू ठाकरे ( वय-२७) व याच गावातील विवाहित तरुण योगेश रामदास ठाकरे (वय-३२) यांनी कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली असून घटने ची माहिती पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना मिळताच त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला सदरील घटनेची माहिती दिली. पाचोरा पोलिसांनी तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी करून दोघांचे शव हे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले याठिकाणी दोघांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले व शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande