जपानचे विमान २६ हजार फूट आले खाली; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे १९१ प्रवाशांचे वाचले प्राण
ओसाका, 2 जुलै (हिं.स.)। अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या आठवणी अजून ताज्या असतानाच चीनमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांघाय विमानतळावरून जपानच्या टोक्योला जाणारे बोईंग ७३७ विमान टेकऑफनंतर अवघ्या १० मिनिटांतच २६,००० फूट उंचीवरून वेगात खाली आले.
boeing 737 flight


ओसाका, 2 जुलै (हिं.स.)। अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या आठवणी अजून ताज्या असतानाच चीनमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांघाय विमानतळावरून जपानच्या टोक्योला जाणारे बोईंग ७३७ विमान टेकऑफनंतर अवघ्या १० मिनिटांतच २६,००० फूट उंचीवरून वेगात खाली आले. या घटनेने विमानातील १९१ प्रवाशांचे प्राण धोक्यात आले. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली.

विमान उड्डाणानंतर केवळ काही मिनिटांतच प्रेशरायझेशन सिस्टिममध्ये बिघाड झाला, त्यामुळे विमानाच्या केबिनमधील हवेचा दाब कमी झाला. परिणामी, विमान झपाट्याने खाली येऊ लागले. एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधत पायलटने आपत्ती व्यवस्थापन सुरू केले. क्रू मेंबर्सनी तात्काळ ऑक्सिजन मास्क वापरण्याचा इशारा दिला.

विमान झपाट्याने खाली येत असताना एअर होस्टेसच्या सूचना ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट उडाली. काहींनी अंतिम मेसेज लिहायला सुरुवात केली, तर काहींनी सोशल मीडियावर निरोपाचे पोस्ट शेअर केल्या. काही वेळासाठी सर्वांना वाटले की हा प्रवास त्यांचा शेवटचा ठरणार आहे.

पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमान सुरक्षितपणे शांघाय विमानतळावर परत उतरवण्यात आले. लँडिंगनंतर सुरक्षा कारणास्तव विमान तासभर रनवेवरच ठेवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जपान एअरलाइन्सने सर्व प्रवाशांना प्रत्येकी १०,००० रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून संपूर्ण घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.

ही घटना विमानप्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असून, संबंधित यंत्रणांनी याचा सखोल तपास सुरू केला आहे. सुदैवाने या प्रसंगी एकही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे.

--------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande