फोन कॉल लीक प्रकरणी थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
बँकॉक , 2 जुलै (हिं.स.)।थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने ''फोन कॉल लीक'' प्रकरणात पंतप्रधान पेताँगतार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्याचा निकाल दिला आहे. या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील.न्यायालयाने ७ विरुद्ध २ अशा
Shinvatra


बँकॉक , 2 जुलै (हिं.स.)।थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने 'फोन कॉल लीक' प्रकरणात पंतप्रधान पेताँगतार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्याचा निकाल दिला आहे. या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील.न्यायालयाने ७ विरुद्ध २ अशा बहुमताने १ जुलैपासून पंतप्रधानांना निलंबित करण्यासंबंधी हा निकाल दिला.

थायलंडच्या संसदेतील ३६ खासदारांच्या गटाने पंतप्रधानांविरुद्ध 'फोन कॉल लीक' प्रकरणात याचिका दाखल केली होती.थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी या प्रकरणात देशाची पत घालवल्याचा विरोधी खासदारांचा आरोप आहे. त्यांच्या या वागण्यामुळे थायलंडची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्कराचा स्वाभिमान दुखावला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.त्यामुळे या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील.

यावेळी न्यायालयात आपली बाजू मांडत आपण जे काही केले ते संघर्ष आणि तणाव टाळण्यासाठी केल्याचे शिनावात्रा यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मे २०२५ मध्ये थायलंड व कंबोडिया दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यात चकमकीत कंबोडियाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता. या तणावातच पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियाचे नेते व माजी पंतप्रधान हून सेन यांना फोन केला होता. हा फोन कॉल लीक झाला. यात शिनावात्रा हून सेन यांना 'अंकल' म्हणून संबोधित केल्याचे स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande