बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरेंच्या बंगल्यासमोर गोळीबार, एक जखमी
बदलापूर , 3 जुलै (हिं.स.)। बदलापुरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. बदलापूरमधील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोर गुरुवारी(दि.३) गोळीबार झाला आहे.या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळाल
गोळीबार


बदलापूर , 3 जुलै (हिं.स.)। बदलापुरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. बदलापूरमधील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोर गुरुवारी(दि.३) गोळीबार झाला आहे.या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.दोन गटातील आपसातील वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अल्ताफ शेखवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यामुळे हा प्रकार पुर्ववैमन्यासातून घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.हा गोळीबार नेमका कोणी केला? कोणत्या कारणामुळे केला? याचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे.आमदाराच्या बंगल्यासमोर हा प्रकार घडल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande