माद्रिद, 3 जुलै (हिं.स.)
पोर्तुगाल
आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन
झाले आहे. जोटा आणि त्याच्या भावाचा स्पेनमधील झमोरा शहरात कार अपघात मृत्यू
झाल्याची माहिती आहे. डिओगो जोटाच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत.
डिओगो
जोटाची लॅम्बोर्गिनी कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना टायर फुटल्यामुळे रस्ता सोडून गेली
आणि नंतर ती आगीत जळून खाक झाली.स्पेनच्या वायव्येकडील झमोराजवळ हा
अपघात झाला. जोटाचा भाऊ आंद्रे सिल्वाही या अपघातामध्ये ठार झाला आहे. २६ वर्षीय
सिल्वा पोर्तुगीज फुटबॉलच्या दुसऱ्या श्रेणीत पेनाफिलकडून खेळत होता.
दरम्यान, गेल्या हंगामात लिव्हरपूलसोबत
प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणारा आणि पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघासाठी डिओगो जोटा खेळला
होता. त्याचप्रमाणे २०१९ आणि २०२५ मध्ये यूईएफए नेशन्स लीग जिंकणाऱ्या पोर्तुगाल
संघाचाही तो भाग होता. २८ वर्षीय जोटाने दोन आठवड्यांपूर्वीच रुट कार्डोसोशी लग्न
केले होते. त्याला तीन मुले देखिल आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra