नाशिक, 3 जुलै (हिं.स.)।
चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले उबाठा गटाचे महानगरप्रमुख मामा राजवाडे आणि उपनेते सुनील बागुल या दोघांना वगळता इतर सर्वांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे तर शरद पवार गटाचे गणेश गीते यांचा देखील भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.
यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विलास शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी महानगर प्रमुख म्हणून नियुक्त केलेलं मामा राजवाडे भाजपात प्रवेश करणार आहेत. याशिवाय उपनेते सुनील बागूल ,सचिन मराठे, प्रशांत दिवे, कन्नू ताजने भगवंत पाठक, अजय बागुल सीमा ताजने, कमलेश बोडके हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत.
शरद पवार गटात विधानसभा निवडणुकीच्या वेळी आलेले गणेश गीते हे देखील पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत असल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला नेते, कार्यकर्ते सांभाळणे अवघड झाले आहे. एकीकडे ठाकरे बंधु मनोमिलन चर्चा घडत असताना अनेक मंडळी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही भाजपात तर काही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत, गिरीश महाजन यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शंभर प्लस चे उद्धिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अनेक जण भाजपात घेऊन पक्ष अधिक प्रमाणात मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
यांचा होणार भाजपात प्रवेश
शिवसेना उपनेते सुनील बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे ,सचिन मराठे, प्रशांत दिवे, कन्नू ताजने भगवंत पाठक, अजय बागुल सीमा ताजने गणेश गीते कमलेश बोडके
दरम्यान साधारणतः सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या सर्वांचा प्रवेश ऐनवेळी थांबविण्यात आलेला आहे कारण यातील मामा राजवाडे आणि उपनेते सुनील बागुल यांच्यावरती भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या प्रकरणात त्यांना अद्यापही जामीन मिळाला नसल्याने हा प्रकार लक्षात आल्याने तुर्त तरी हा प्रवेश थांबविण्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI