संत गजानन पालखी सोहळ्याचे माचणूर मध्ये दिमाखात स्वागत
सोलापूर, 3 जुलै (हिं.स.)। विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी पालखी सोहळा असलेली संत गजानन महाराज यांच्या श्रीच्या पंढरपूर पालखी पाई वारीचे यंदा 56 वे वर्ष आहे .संत गजानन महाराज संस्थाने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेव
Sant Gajanan Maharaj


सोलापूर, 3 जुलै (हिं.स.)। विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी पालखी सोहळा असलेली संत गजानन महाराज यांच्या श्रीच्या पंढरपूर पालखी पाई वारीचे यंदा 56 वे वर्ष आहे .संत गजानन महाराज संस्थाने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. शेगाव येथील मंदिरातून 2 जून रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास ते 33 दिवसात सातशे किलोमीटर चालत वाटेत लागणाऱ्या 9 जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे. खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर टोपी, अंगामध्ये पांढरा शर्ट व पायजमा अशा गणवेशातील वारकरी सगळयांचे लक्ष वेधून घेत होती. पालखी सोहळ्यात अग्रभागी गजानन बँडपथक, दोन अश्वावर भालदार ,चोपदार मध्यात एक अश्व त्या पाठोपाठ भगव्या पताकाधारी वारकरी त्यामागे शिस्तीत दोन रांगेत शेकडो टाळकरी व भजनी दिंडी नंतर मंगलवाद्य व श्री चा रजत मुखवटा असणारी पालखी मेणा रथ असे स्वरूप होते. संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेत्वस्त्रधारी 700 वारकरी अडीचशे पताकादारी 250 टाळकरी, 200 सेवेकरी ,दोन रुग्णवाहिका तीन माल ट्रक, दोन अश्व, एक प्रवासी बस,एक पाणपोई ट्रक, अशा शिस्त रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते माचणूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत आज भाविकांकडून सिद्धेश्वर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.महामार्ग लगत असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर आकर्षक रांगोळी व गुलाब पाकळ्यांची पायघड्या करीत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचे या परिसरात आहे ग्रामस्थ आणि अतिशय उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले त्यानंतर पालखीचे सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करतात वाढी आवाजातील जयघोष ,टाळ मृदंगाच्या गजरात तितक्या तन्मयतेने पडणाऱ्या पकवाजावरच्या थापा व टाळ्यांच्या कडकडाटात सबंध हा परिसर भक्तीमय वातावरणात हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. मंदिराच्या परिसरात वारकऱ्यासाठी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था गेल्या 40 वर्षापासून माचणूर येथील सुनील नांदे या भाविकांकडून करण्यात आली होती. तसेच माचणूर येथील फार्मर मॉल उद्योजक जनार्दन शिवशरण यांच्याकडून पालखी सोहळा महामार्गावर वारकऱ्यांना नाश्ता, चहा व फळांची व्यवस्था करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande