अहिल्यानगर दि. 3 जुलै (हिं.स.) :- अहिल्यानगर जिल्ह्या तील नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी तसेच जिल्ह्यात गेल्या २५ वर्षा पासुन अधिक वर्षे खेळाडू निर्माण करणाऱ्या अकॅडमी तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही भव्यदिव्य 25 वी टॉपर्स खुली राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर बुरुडगाव रोड कै. पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंक येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धेत राज्यामधील तसेच नगर जिल्ह्य़ासह, संगमनेर, श्रीरामपूर, राहुर, श्रीगोंदा, अष्टी, कडा, बिड, संभाजीनगर, सुपा, शिरुर, पुणे, जामखेड , सोलापूर, बार्शी तसेच अकॅडमी, शाळा, जिल्ह्य़ातील स्केटिंग प्रेमी खेळाडू, पालक, प्रशिक्षक यांनी आपली उपस्थिती लाऊन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. अशी माहिती अकॅडमीचे सल्लागार असिफ ईकबाल शेख व अध्यक्ष तथा संस्थापक प्रदीप पाटोळे यांनी दिली.अहिल्या नगर महानगर पालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांना सर्व खेळाडूंना स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या. सादर स्पर्धेत क्वाड, इनलाईन, रिक्रिएशन इनलाईन, टेनासिटी स्केट प्रकार वय वर्ष ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४ व खुल्या गटातील खेळाडुंना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती अकॅडमीचे कार्य अध्यक्ष संजय नन्नवरे यांनी दिली.
विशेष या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू कार्तिक नन्नवरे व इतर खेळाडू सोहम शिंदे, वैभव पाटोळे, जय भंडारी, विआन मुथा, ईश्वरी आव्हाड, संस्कार कुलकर्णी, जोना जाधव, आदर्श बिश्वास, प्रणित पोखर्णा आदी खेळाडूंचे अती वेगवान सामने लाक्षणिक ठरले तर सर्वाधिक लहान वय साडे तीन वर्षे असणाऱ्या श्रेणिका देशमुख व नुमान शेख यांनी सुंदर स्केटिंग करून सुवर्ण पदकची कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली अशी माहीती अकॅडमीचे सह.सचिव प्रविण गायकवाड व सदस्या विशाल साळवे. यांनी माहिती दिली.स्पर्धेच्या व्यवस्थापना करिता पियुष कदम, अक्षय चौधरी, प्रतिक्षा पाटोळे, आदित्य शिंदे, दर्शना काठेड, आदित्य सोनवणे यांनी काम पाहिले स्पर्धा सुव्यवस्थेचा पार पाडण्या करिता पंच म्हणून ज्ञानेश्वर भोत, अमर लोंढे, जयेश आनंदकर, संजय वखारे, भिकन अंबे, अजय भटकर, संतोष धुत, सचिन डोंगरे, महेश आनंदकर, मुकेश चौधरी, वासिक शेख, सचिन गायकवाड, प्रीतम जाधव यांनी काम पाहिले तर किड्स क्लब प्री स्कुल च्या प्रिंसिपल रोहिणी धवक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni