अमरावती, 3 जुलै (हिं.स.) : अमरावती शहरात छत्री तलाव परिसरात घडलेल्या एका घटनेचे व्हिडिओ खूप जोरात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,काही युवक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळी छत्री तलाव या निसर्ग रम्म वातावरणात मित्रा सोबत गेला असता त्याला अचानक एका स्त्री भूतनीचा रडण्याचा आवाज ऐकू येतो ते पाहण्यासाठी गेला असता त्याला स्त्री भूतनी एका काळा कपड्यांमध्ये दिसते आणि त्याला मारते असे व्हायरल झालेल्या फोटो मध्ये दिसत आहे आणि एक व्हिडिओ मध्ये संपूर्ण अंधार असून त्यामध्ये फक्त एका स्त्री भूतनीचा चा रडण्याचा आवाज ऐकू येतो या व्हायरल फोटो व्हिडिओ मुळे संपूर्ण भयभीत वातावरण निर्माण झाले असून सायबर पोलिस याचा व्हायरल झालेल्या फोटो व्हिडिओचा तपास करत आहे.. नागरिकांनी या व्हायरल झालेल्या फोटो व्हिडिओ वर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे,ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यामुळे समाजामध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, अशाप्रकारे अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे, पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणाची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे तर लोकांनी देखील अशा अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा संघटक हरीश केदार यांनी केलं आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी