अचलपूरमध्ये अडत्याच्या निष्काळजीपणामुळे 20 कट्टे गव्हाला पावसामुळे फुटले कोंब
- अडत्याने केले हात वर, शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी अमरावती, 3 जुलै (हिं.स.) अडत्याच्या निष्काळजीपणामुळे वीस कट्टे गव्हाला अक्षरशः पावसामुळे कोंब फुटले आहे. एफ.ए. क्यू. दर्जाच्या गव्हाची अशाप्रकारे माती झाल्यामुळे सदर शेतकऱ्याला हजारो रुपयांचे
अचलपूर बाजार समिती मधील अडत्या म्हणतो..... तो मी नव्हेच शेतकऱ्याच्या २० कट्टे गव्हाच्या पोत्यांची झाली ऐसी की तेसी


- अडत्याने केले हात वर, शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

अमरावती, 3 जुलै (हिं.स.)

अडत्याच्या निष्काळजीपणामुळे वीस कट्टे गव्हाला अक्षरशः पावसामुळे कोंब फुटले आहे. एफ.ए. क्यू. दर्जाच्या गव्हाची अशाप्रकारे माती झाल्यामुळे सदर शेतकऱ्याला हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन तर करावे लागलेच आहे. शिवाय फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी शेतकरी योगेश बुटे यांनी सचिव योगेश चव्हाण यांना तक्रार दिली असून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ठेवला होता. जागेअभावी सदर कट्टे बाजारसमितीच्या कार्यालयात योगेश बुटे रा. बेलज यांनी मे २०२५ रोजी सुमारास २५ सायंकाळच्या महालक्ष्मी आडत दुकानाचे संचालक प्रदीप धोंडे यांच्या अडत दुकानात २० कट्टे गहू विक्रीसाठी ठेवला होता. जागेअभावी सदर कट्टे बाजारसमितीच्या कार्यालयात पुढे असलेल्या झाडाखाली ठेवल्या गेले. योग्य भाव आल्यानंतर विक्री करावी, असे धोंडे यांना बुटे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. जून महिन्यात पाऊस सुरू झाला. तरी सदर कट्टे सुरक्षित ठिकाणी हलविण्याऐवजी तेथेच ठेवण्यात आले. अडत दुकानदाराने आपले कर्तव्य समजून सदर कट्टे शेडमध्ये ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती. अनेक दिवस पाऊस झेलत सदर कट्टे भर पावसातच चिंब होत राहिले. २ जुलै रोजी गुरुवार आठवडी बाजार असल्याने बुटे यांनी २ जुलै रोजी बाजारसमितीमध्ये येऊन गव्हाच्या पोत्यांची पाहणी केली असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. एवढ्या प्रचंड मेहनतीने भर उन्हात ओलीत करून आणि हजारो रुपये खर्च करून गव्हाचे उत्पन्न बुटे यांनी घेतले होते. सदरचे गहू विकून आलेल्या पैशातून बी बियाणे रासायनिक खते आणि शेतीच्या अंतर मशागतीचे स्वप्न कुठे यानी पाहिले होते.मात्र अडत दुकानदाराच्च्या गंभीर चुकीमुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

दरम्यानच्या काळात अनेक वेळा संपर्क करून गहू सुरक्षित आहे का, विक्री केव्हा करणार आहात, याबाबत अडत दुकानदाराशी संपर्क साधला असता तुमच्या गहू एकदम सुरक्षित आहे. चांगला भाव आल्यास विकला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते; मात्र आता अडत दुकानदाराने चागलेच घूमजाव केले असूनसदर गहू आपल्या अडतमध्ये ठेवलाच नसल्याचे ते म्हणत असून आपल्या अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रयत्न करीत आहे: मात्र बुटे आपल्या मागणीवर ठाम असून जर दोन दिवसांत नुकसान भरपाई दिली नाही, तर बाजारसमिती आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पत्राच्या प्रती माजी आमदार बच्चू कडू, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिल्या आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande