जून महिन्यातील सेवानिवृत्त 12 अधिकारी, कर्मचारी यांचा नमुंमपात सन्मान
नवी मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणा-या 12 नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती सन्मान समारंभप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर व अतिक्रमण विभाग
जून महिन्यातील सेवानिवृत्त 12 अधिकारी, कर्मचारी यांचा नमुंमपात सन्मान


नवी मुंबई, 3 जुलै (हिं.स.)।

नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणा-या 12 नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती सन्मान समारंभप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी जीवनाचे सार सांगणारी कविता सादर केली तसेच निवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचारी यांच्यासमवेत काम करतानाचे अनुभव सांगितले व शुभेच्छा दिल्या.

उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी सेवानिवृत्तीप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांच्या मनात आनंद आणि हुरहूर अशी संमिश्र भावना असते असे सांगत यापुढील काळात नोकरीमध्ये असताना जपायचा राहून गेलेला छंद जोपासा, कुटूंबासाठी वेळ दया असे मनोगत व्यक्त करीत सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून जून महिन्यात निवृत्त होणारे भांडार विभागाचे उपायुक्त शंकर खाडे, अधिक्षक - वसूली अधिकारी कुंदा तरे, लेखा अधिकारी गीता पालव, मुख्याध्यापक मिनाक्षी पुरकर, प्राथामिक शिक्षिका सुरेखा सुरवसे, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ अनुजा देशमुख, वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक गणेश पाटील, वाहनचालक प्रकाश भोईर, मीटर वाचक अनिल पाटील, कक्षसेविका मालन पवार, सफाई कामगार बाळू शिरसाट व भगवान सुरडकर अशा 12 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande