चेन्नई, 3 जुलै (हिं.स.)
तामिळनाडू
प्रिमियर लीगमध्ये भारताच्या आर. अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी
केली आहे. अश्विनने फक्त ४८ चेंडूत ८३ धावा केल्या. टीएनपीएल २०२५ हंगामामधील त्याची
सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
त्रिची
ग्रँड चोलस विरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार
अश्विनने ४८ चेंडूत ८३ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ११
चौकार मारले. यापूर्वी त्याने गोलंदाजीतही आपली चमक दाखवली होती. अश्विनने ४ षटकात प्रतिस्पर्धी
संघाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या शानदार अष्टपैलू कामगिरीसाठी
अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तामिळनाडू
प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी डिंडीगुल ड्रॅगन्सचा सामना चेपॉक सुपर
गिलीज संघाशी होणार आहे. तर तामिळनाडू प्रिमियर लीगचा अंतिम सामना ६ जुलैला
खेळवण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra