मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी हा 'विकसित महाराष्ट्र' घडवण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने अहोरात्र झटणारा एकमेव परिवार आहे. ही बाब राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. नाशिकमधील विविध पदाधिका-यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिक शहरातील शिवसेना उबाठा गटामधील उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक सचिन मराठे, माजी नगरसेवक व नामको बँकचे संचालक प्रशांत दिवे, माजी नगरसेविका डॉ. सीमाताई ताजणे, माजी नगरसेवक कमलेश बोडके, उपजिल्हा प्रमुख कन्नू ताजणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे गणेश गिते आदी मान्यवरांनी आज विकासाचे 'कमळ' हाती घेतले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, आ. राहुल डिकले, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, बाळासाहेब सानप, सुधाकर बडगुजर, लक्ष्मण सावजी, विजय माने आदी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर