इस्कॉन श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीची घोषणा
जालना, 30 जुलै (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ ( इस्कॉन) जालना मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव-2025 समिती गठीत करण्यात आली आहे. बुधवारी ( ता. 30) गंगाधर वाडी परिसरातील इस्कॉन मंदिरात बैठकीत पदाधिकाऱ्यांची घोषणा करण
*इस्कॉन श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीची घोषणा


जालना, 30 जुलै (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ ( इस्कॉन) जालना मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव-2025 समिती गठीत करण्यात आली आहे.

बुधवारी ( ता. 30) गंगाधर वाडी परिसरातील इस्कॉन मंदिरात बैठकीत पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी मंदिर प्रमुख रास गोविंद प्रभू,युवक कल्याण मंडळाचे अध्यक्ष उद्योजक घनश्यामदास गोयल,उपाध्यक्ष कमलबाबू झुनझुनवाला, छाया अग्रवाल, यांची प्रमुख उपस्थिती होती.

रास गोविंद प्रभू यांनी इस्कॉन मंदिरातर्फे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव दि.16 ते 17 ऑगस्ट या कालावधीत भरगच्च धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे . असे सांगून सर्वांनी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. उद्योजक घनश्यामदास गोयल यांनी समितीची घोषणा केली. यात अध्यक्ष डॉ. विवेक केंद्रे, सचिव विनोद कुमावत, उपाध्यक्ष मीत अग्रवाल, कन्हैया खेरुडकर ,कोषाध्यक्ष गोविंद दत्त प्रभू यांच्या सह भाविकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL


 rajesh pande