रत्नागिरी झेडपी शाळांमधील मुलांना नासाला पाठविण्याचा उपक्रम नावीन्यपूर्ण - सीमा व्यास
रत्नागिरी, 31 जुलै, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना नासासारख्या संस्थांमध्ये पाठविण्याचा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे, अशा शब्दांत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी नावीन्यपूर्ण कामाचा गौरव
सीमा व्यास यांची आढावा बैठक


रत्नागिरी, 31 जुलै, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना नासासारख्या संस्थांमध्ये पाठविण्याचा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे, अशा शब्दांत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी नावीन्यपूर्ण कामाचा गौरव केला.

क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १५० दिवसांच्या आराखड्याबाबत व्यास यांनी नियोजन समिती सभागृहात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत स्तरावर अपूर्ण, प्रलंबित असणारी विकासकामे प्रथम पूर्ण करावीत. अशा कामात एखाद्याला स्वारस्य नसल्यास, तसे शासनाला कळवून ती रद्द करावीत. नावीन्यपूर्ण योजनेमधील कामे सृजनात्मक असावीत, अशी सीमा व्यास यांनी यावेळी केली.

व्यास यांनी विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अखर्चित अपूर्ण कामांबाबत त्या म्हणाल्या, पंधराव्या वित्त आयोगामधून प्रलंबित, अपूर्ण असणाऱ्या कामांचा आढावा शासन स्तरावर घेण्यात आला आहे. निधी अखर्चित ठेवू नये. जिल्हा परिषदेने अशी अपूर्ण कामे कोणत्या कारणाने प्रलंबित आहेत, त्याचा आढावा घ्यावा. ती प्रथम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. एखाद्या गावाला त्यामध्ये स्वारस्य नसेल तर ते काम रद्द करण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा. नावीन्यपूर्ण योजनेमधून कामे राबविताना ती सृजनात्मक असावीत. कमान बांधणे, बस शेड बांधणे यामध्ये काय नावीन्यपूर्ण उपक्रम आहे, या बाबी शासन स्तरावर ठळक झाल्या आहेत. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना राबविताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक कामे करावीत.

बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande