ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे म्हणजे लष्कराचा अपमान करण्यासारखे - मुख्यमंत्री
मुंबई, 30 जुलै (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा लष्कराचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला. मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, 30 जुलै (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा लष्कराचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला. मुंबई येथे आज, बुधवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह आज(दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, प्रणिती शिंदेंनी केलेले विधान सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे मला असे वाटते की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील, तर निश्चितपणे अशांच्यासमोर प्रश्न चिन्ह लागणे हे स्वाभाविक आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी(दि.२९) सांगितले की, कदाचित बोलणारे नवीन आहेत. म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही, ते त्यांच्या मुखातून बोलून घेत आहेत. अशी शंका पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ती योग्य वाटते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले कि, काल पंतप्रधानांनी काँग्रेसला उघडे पाडले आहे. जी भाषा पाकिस्तान बोलतोय, तीच भाषा काँग्रेस बोलत आहे. हे पंतप्रधानांनी आपल्यासमोर स्पष्ट केले आहे. रक्षामंत्री आणि विदेश मंत्र्यांनीही कशा प्रकारे आपली विदेश नीती राहिली? याबाबत सांगितले. जगातील 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिले. पाकिस्तान आपले काही वाकडे करू शकला नाही. मात्र, भारताने पाकिस्तानच्या एअर फिल्ड कशा नष्ट केल्या, हे सगळे पुराव्यानिशी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande