जालना : विनयभंग प्रकरणातील क्रीडा व्यवस्थापकाच्या बडतर्फीची मागणी
जालना , 30 जुलै (हिं.स.) : जालना जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनीतील मुलींवर विनयभंग केल्याप्रकरणी वसतिगृह व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात तात्काळ सेवामुक्ती आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा
क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यवस्थापकाला तात्काळ बडतर्फ करा – नंदा पवार यांची प्रशासनाकडे मागणी


जालना , 30 जुलै (हिं.स.) : जालना जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनीतील मुलींवर विनयभंग केल्याप्रकरणी वसतिगृह व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात तात्काळ सेवामुक्ती आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी केली आहे. नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील प्रशासनाच्या हालचाली अपुऱ्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी रेल्वे स्टेशन रोडलगत जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहात काही महिन्यांपासून व्यवस्थापक प्रमोद खरात हा मुलींवर अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांच्या आदेशावरून महिला केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांनी वसतिगृहाला दोन दिवसांपूर्वी भेट दिली असता, अनेक मुलींनी व्यवस्थापकाविरोधात गंभीर आरोप केले. तक्रारीनुसार, खरात हा मुलींना सीसीटीव्ही नसलेल्या खोल्यांमध्ये बोलावून त्यांच्या शरीरावर हात फिरवण्यासारखे विकृत वर्तन करीत होता. तसेच संबंधित मुलीला धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल, पण बडतर्फी अद्याप नाही या प्रकाराची गंभीर दखल घेत रविवारी रात्री गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांच्या फिर्यादीवरून जालना पोलिस ठाण्यात प्रमोद खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, तो अद्याप सेवेत असून यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. नंदा पवार यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली की, “अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला तात्काळ सेवेतून बडतर्फ करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL


 rajesh pande