ऐरोलीत उद्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना व्याख्यानातून वैचारिक अभिवादन
नवी मुंबई, 31 जुलै (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनानिमित्त शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखल
ऐरोलीत उद्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना व्याख्यानातून वैचारिक अभिवादन


नवी मुंबई, 31 जुलै (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनानिमित्त शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेंतर्गत साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख असणारे डॉ. रणधीर शिंदे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक देखील आहेत. ‘विचारवेध’ मध्ये ते ‘सामाजिक क्रांती आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे’ या विषयावर ते अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात असून तेथे सातत्याने चालणा-या ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेतून विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक व्यक्तींचे विचारधन अनुभवता येते. त्यामुळे येथील व्याख्यानांची श्रोते वाट पहात असतात.

तरी 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी सायं. 6.30 वा. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande