मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गुरुवारी निर्णय
मुंबई, 30 जुलै, (हिं.स.)। मालेगाव शहरात १७ वर्षांपूर्वी घडलेल्या शक्तिशाली स्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालय ३१ जुलै रोजी निकाल सुनावणार आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण


मुंबई, 30 जुलै, (हिं.स.)। मालेगाव शहरात १७ वर्षांपूर्वी घडलेल्या शक्तिशाली स्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालय ३१ जुलै रोजी निकाल सुनावणार आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जण या प्रकरणात आरोपी आहेत.

हे प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते, कारण यामध्येच प्रथमच ‘हिंदू दहशतवाद’ आणि ‘भगवा दहशतवाद’ असे शब्द वापरण्यात आले होते. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना ३१ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विशेष प्रकरणातील निकालाच्या पार्श्वभूमीवर, त्या दिवशी न्यायालयीन संकुलातील इतर खटल्यांच्या सुनावण्या स्थगित ठेवण्यात येणार आहेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणात एकूण १२ जण आरोपी होते, त्यापैकी ५ जणांना विशेष एनआयए न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच निर्दोष घोषित करण्यात आले आहे.तर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टिनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी या सात आरोपींवर अद्याप खटला सुरु आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी, रमजान महिन्याच्या दरम्यान रात्री सुमारे ९.३५ वाजता मालेगावच्या भीखू चौकात एक शक्तिशाली स्फोट झाला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार होती. या स्फोटात ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे २९१ किमी अंतरावर आहे.

१९ एप्रिल रोजी, न्यायालयाने या प्रकरणात निकाल राखून ठेवला होता आणि आरोपींना ८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी आता ३१ जुलै ही अंतिम निकालाची तारीख ठरवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande