नवी दिल्ली, 30 जुलै (हिं.स.)
पंतप्रधान
नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता जारी करणार आहेत.पंतप्रधान त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी
येथे आयोजित एका कार्यक्रमात २० व्या हप्त्यात सुमारे २०,५०० कोटी रुपयांची रक्कम ९.७ कोटी शेतकऱ्यांना
हस्तांतरित करतील.
केंद्रीय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी
एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांच्या
नेतृत्वाखाली २ ऑगस्ट रोजी वाराणसीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल
आणि शक्य तितक्या जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठीच्या तयारीबद्दल
विस्तृत चर्चा झाली. देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी
विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुखांनी व्हर्च्युअल
माध्यमातून बैठकीत भाग घेतला.
वाराणसी
येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील शेतकऱ्यांना
जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री चौहान यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना
दिल्या. आणि देशव्यापी पातळीवर मोहिमेच्या रूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक
चौकट निश्चित करण्यास सांगितले.
किसान
सन्मान निधी अंतर्गत ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये आणि दर ४ महिन्यांनी एक हप्ता
दिला जातो. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत १९ हप्त्यांमध्ये
३.६९ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra