लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही - यूएन
नवी दिल्ली , 30 जुलै (हिं.स.)। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या( यूएन) टीमने पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. यूएनने सांगितले आहे की, “पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या गटाने पहलगाम दहशतवादी हल
पहलगाम हल्ला


नवी दिल्ली , 30 जुलै (हिं.स.)। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या( यूएन) टीमने पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. यूएनने सांगितले आहे की, “पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या गटाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची दोन वेळा जबाबदारी स्वीकारली होती आणि “घटनास्थळाचा एक फोटो प्रकाशित केला होता”. यूएनच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या समर्थनाशिवाय शक्यच नव्हता.

यूएनमध्ये आयएसआयएल, अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांवर वॉच ठेवणाऱ्या टीमने ३६ वा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की,“पाच दहशतवाद्यांनी जम्मू कश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी हल्ला केला.टीआरएफ ने याच दिवशी हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि घटनास्थळाचा एक फोटोही प्रकाशित केला होता.”हा अहवाल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा प्रतिबंध समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्यात असंही नमूद आहे की,“ टीआरएफ ने दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, मात्र २६ एप्रिल रोजी त्यांनी आपला दावा परत घेतला. त्यानंतर टीआरएफ कडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.”

अहवालात असंही म्हटलं आहे की, हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत. पहलगामचा हल्ला टीआरएफने केला असंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर याच महिन्यात अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यात २५ भारतीय पर्यटक होते तर १ नेपाळमधील होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande