नाशिक झेडपीच्या सीईओ मित्तल यांची जालन्याला बदली
नाशिक, 30 जुलै (हिं.स.) - नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली असून त्यांच्या जागेवरती अजून पर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिक
झेड पी सीईओ मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदी बदली


नाशिक, 30 जुलै (हिं.स.) - नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली असून त्यांच्या जागेवरती अजून पर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मितल यांची राज्य शासनाने जालन्याच्या जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या जागेवरती बदली केलेली आहे. मितल यांची नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्याचे फळ म्हणून नाशिक जिल्हा परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये स्थान मिळालं हे त्यांचे मोठे यश असून याशिवाय प्रशासनामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले त्यांचे काही निर्णय हे राज्यामध्ये आदर्श निर्णय म्हणून राज्य सरकारने स्वीकार केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande